गुरुवार, १० डिसेंबर, २०१५

ज्ञानरचनावाद

⭕ ज्ञानरचनावाद⭕
⚪"पूर्वानुभवाच्या किंवा पूर्वज्ञानाच्या आधारे जेव्हा व्यक्ति नविन संकल्पनांची , संबोधांची रचना करते तेव्हा त्यातून अध्ययन घडते यास ज्ञानरचनावाद  म्हणतात  "⚪
गटशिक्षणाधिकारी श्रीमती भराडे मॅडम यांची वेबसाईट Click
  वैशिष्ट्ये  :--
1⃣     घोकंपट्टीपासून सुटका :- आकलन करून समजुन अभ्यास करता येतो .
2⃣    शाळेबाहेरचे जग आणि  शाळेतील शिकणे यांची सांगड घालता येते
3⃣      अध्ययन कौशल्यांचा विकास :- श्रवण  , भाषण, वाचन , लेखन ,संभाषण , अभिव्यक्ति या कौशल्याचा               विकास करणे सोपे होत.े
4⃣     नविन माहिती पूर्वज्ञानाशी जुळणारी असेल तर पूर्वीच्या ज्ञानात भर पड़ते .
5⃣     आंतरक्रियेमुळे ज्ञाननिर्मितीला फायदा होतो.
 पाठ शिकवताना खालील कृती अवश्य करून घ्याव्यात....
1⃣      पाठ एक दिवस आधी वाचुन येण्यास सांगा
2⃣     पाठ मधील चित्र दाखवून मुलांचे गट करून चर्चा घडवून आणा.
3⃣    झालेली चर्चा प्रत्येक गटातील मुलाला सांगण्याची संधी दया .
4⃣    गटात चित्रावर आधारित पाच सहा ओळी माहिती लिहिण्यास  सांगा
5⃣   प्रत्येक गटातील मुलाला माहिती वाचण्यास सांगा
6⃣     पाठाचा आशय स्पष्ट करून सांगा   . चर्चा घडवून आणा .
7⃣    योग्य तेथे साहित्याचा वापर करा .
8⃣    नविन शब्दाचा वाक्यात उपयोग करून घ्या
9⃣      संवादात्मक पाठ मुलांना पात्र देवून नाटयीकरणाद्वारे सादर करून घ्या .
1⃣0⃣    कविता साभिनय सादर करून घ्या .
↪      आपल्या भूमिकेत थोडा बदल करून
शिकणे ही क्रिया अधिक मनोरंजक करू या .
आपण कमी बोलून मुलाना बोलते करून त्यांना व्यक्त होण्याची संधी उपलब्ध करून दया .




शैक्षणिक साहित्य निर्मिती व थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न काही संकलन करून देत आहे.........
चित्र रूपात.......





























चलचित्रे पहा